Regional Poems

विरह विरहित

नवीन जन्मलेल्या बाळाची पहिली स्मित तू
पहिल्या पावसाळ्यात मातीचा ओलाव्याचा सुगंध तू
चिंब चिंब भिजे मन माझे
ह्या वीरान मनाला ओलावा असे बोल तुझे

थेंब थेंब साठे तळा, थेंब थेंब साठे तळा
अजूनही कसा नाही भरला माझ्या मनाचा तळा?
तुझ्या मधुर शब्दांचा अविस्मरणीय पेय
याचा लागला आहे माझ्या मनाला लळा

कसे विसरू मी तुझ्या सखोल नेत्रांचे बोल?
शब्द ही फुटेना, झाले हृदय माझे अबोल

गोडावा तुझ्या मनाचा हृदयात माझ्या विरघळला
काटे हृदयातले माझे कोठे बरे हरवले?
झाले मनं एक, आता कसला हा विरह!